बीड धारदार हत्याराने गळ्यावर व मानेवर वार

परळी : चार वर्षाच्या भाच्याचा सख्ख्या मामानेच खून केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील नागापूर कॅम्प येथे घडली. कार्तिक विकास करंजकर असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी शहाणिक लक्ष्मण चिमणकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ( Beed Murder) या घटनेची नोंद परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील लाडेगाव येथील सुरेखा करंजकर या नागापूर कॅम्प येथे आई व भावाला भेटण्यासाठी तीन दिवसांपूर्वी आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा चार वर्षांचा मुलगा कार्तिक होता. आज (दि.11) त्या परत आपल्या सासरी जाणार होत्या. शनिवारी रात्री घरातील सर्वजण एकत्र जेवण करून झोपले होते. सर्वजण झोपेत असताना सुरेखा यांचा भाऊ शहाणिक चिमणकर याने धारदार हत्याराने कार्तीकच्या गळ्यावर व मानेवर वार करून खून केला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.

संशयीत आरोपी शहानिक हा त्याच्या आईला सारखा त्रास देत होता, म्हणून सुरेखा त्याला समजवण्यासाठी माहेरी आली होती. शनिवारी रात्री त्याला समजवून सांगताना दोघा बहीण-भावात वादावादी झाली होती. त्यातूनच आरोपीने भाच्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here