प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध,मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

खंडणी उकळण्यासाठी मंथनने हा धक्कादायक प्रकार केला असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. आदित्यच्या कुटुंबीयांचा बदला घेण्याच्या भावनेतून हे कृत्य केल्याची कबुली मंथनने दिली. आदित्यची नातेवाईक असलेल्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता आणि याच रागातून आदित्यची हत्या केली असावी, अशी शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत

पुणे : पिंपरी-चिंचवड मध्ये धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. प्रेम प्रकरणाला विरोध होत असल्याने रागाच्या भरात एका तरुणाने आठ वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली.

आदित्य ओगले असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. सदर इसमाने वीस कोटींची खंडणी घेण्यासाठी अल्पवयीन मुलाचं अपहरण केलं होतं. ही धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-chinchwad) घडल्याने पुणे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मंथन भोसले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मंथनने आदित्यचं गुरुवारी अपहरण केलं होतं. आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल पोलिसांत दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या गंभीर प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. पोलिसांनी मंथनची चौकशी सुरु केली असता त्याच्याकडून संशयास्पद प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे पोलिसांनी मंथनची कसून चौकशी केल्यानंतर केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याने कबुली दिली. पैशांच्या हव्यासापोटी मंथनने आदित्यची हत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here