भारताची सर्वात वेगवान रेल्वे ‘वंदे भारत’ने बुलेट ट्रेनचा रेकाॅर्ड माेडला

अहमदबाद-मुंबई वंदे भारत…
अहमदाबाद-मुंबई वंदे भारत रेल्वे लवकरच सुरू हाेणार आहे. ही गाडी ३० सप्टेंबरपासून सुरू हाेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने ही भेट प्रवाशांना मिळू शकते.

अहमदाबाद : बुलेट ट्रेन ही जगातील सर्वात वेगवान रेल्वे म्हणून ओळखली जाते. मात्र, भारताची सर्वात वेगवान रेल्वे ‘वंदे भारत’ने बुलेट ट्रेनचा रेकाॅर्ड माेडला आहे.
पिकअपच्या बाबतीत वंदे भारतने बुलेट ट्रेनला पछाडले आहे. ० ते १०० किमी ताशी वेग पकडण्यासाठी वंदे भारतने केवळ ५२ सेकंद घेतले. तर बुलेट ट्रेनला ५४ सेकंद लागतात.

वंदे भारत रेल्वेच्या देशातील विविध भागात चाचण्या सुरू आहेत. अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. त्यावेळी वंदे भारतने केवळ ५२ सेकंदांमध्ये ताशी १०० किमी एवढा वेग घेतला. बुलेट ट्रेनला यासाठी ५४.६ सेकंद लागतात. त्यामुळे या गाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला गेला आहे.

पाच तासांमध्ये गाठले मुंबई सेंट्रल
अहमदाबाद ते मुंबईपर्यंतचे अंतर वंदे भारतने केवळ ५ तासांमध्येच कापले. सकाळी सव्वासात वाजता निघालेली रेल्वे दुपारी १२.१६ वाजता मुंबई सेंट्रल येथे पाेहाेचली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here