एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय तरुणीला शाहरुख नावाच्या तरुणाने जिवंत जाळले

झारखंडमधील दुमका येथे १९ वर्षीय तरुणीला शाहरुख नावाच्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. घटनेनंतर पीडितेला रांचीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, पीडितेचा उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनाकडून परिसरात जमावबंदी करण्यात आला आहे.

२३ ऑगस्ट रोजी अल्पसंख्याक समाजातील शाहरुख नावाच्या तरुणाने शेजारील व्यापारी संजीव सिंग यांची १९ वर्षीय मुलगी अंकिता हिला रात्री उशिरा झोपेत असताना खिडकीतून पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. एकतर्फी प्रेमातून त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या घटनेत अंकिता ९० टक्के भाजली होती. उपचारासाठी तिला रांचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवार उपचारादरम्यान,तिचा मृत्यू झाला. दरम्यान, पीडितेने आपल्या शेवटच्या जबाबात जशी मी मरण यातना भोगत आहे तशीच शिक्षा त्याला द्या अशी मागणी केली आहे.

अंकिताच्या मृत्यूनंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने घोषणाबाजी करत दोषीला फाशीची मागणी केली आहे. परिसरातील वाढता तणाव लक्षात घेता दुमका शहरात सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंबर लडका यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here