मुलीचा सख्खा भाऊ आणि चुलत भाऊ दोघांनी दोन प्रेमीना संपवून टाकले

सैराट चित्रपटासारखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालकाच्या मुलीसोबत प्रेम झाल्यावर मुलगा दलित समाजाचा असल्यामुळे तिच्या भावांनी दोघांना संपवल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
मृत तरूणाचं नाव अंकित असं नाव आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
अंकित हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता, यादरम्यान त्याचं ट्रॅक्टर मालकाच्या मुलीसोबत प्रेम जुळतं. मात्र अंकित हा दलित समाजाचा होता त्यामुळे दोघांच्या नात्याला घरच्यांचा विरोध होता. काही दिवसांनी दोघांच्या प्रेम प्रकरणाबद्दल मुलीच्या घरच्यांना माहित होतं. त्यामुळे मुलीचा सख्खा भाऊ आणि चुलत भाऊ दोघांना संपवून टाकतात.

ऊसाच्या शेतामध्ये मुलगा अंकितचा मृतदेह सापडतो, त्यानंतर अंकितचे वडील मुलीच्या घरी जातात तेव्हा त्यांच्या मुलीचाही मृत्यू झाल्याचं समजतं. मुलीला मारून एका शेतामध्ये तिचा मृतदेह पुरल्याचं समोर येतं. याबाबत पोलिसात तक्रार केल्यावर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मृतदेह सापडले तेव्हा दोघांच्या शरीरावर खोल जखमाही असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्या हत्येच्या प्रकरणात मुलीच्या भावांवर गुन्हा दाखल केला गेला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here