श्रावण महिन्‍यात भाविकांच्‍या सुविधेसाठी जादा बसगाड्या उपलब्‍ध असणार

नाशिक : धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्‍या जाणाऱ्या श्रावण महिन्‍याला सुरवात होत आहे. या कालावधीत त्र्यंबकेश्‍वरला दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते.

सोमवारी भाविक प्रवाशांची वाढीव संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (MSRTC) एसटीबसगाड्यांचे नियोजन आखले जात आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारी शहरातील विविध भागातून बसगाड्या सोडण्याचेही विचाराधीन आहे. (Extra buses from ST on Shravan from Monday nashik latest marathi news)

दरवर्षी श्रावण महिन्‍यात त्र्यंबकेश्‍वर भाविकांची मांदियाळी असते. जिल्‍हाभरासह राज्‍य व देशातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमिवर भाविकांच्‍या सुविधेसाठी एसटी महामंडळाकडून जादा बसगाड्या उपलब्‍ध करून दिल्‍या जात असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here