वुमन्स इंजिनिअरिंग कॉलेज,चौदा विद्यार्थिनींना अन्न पाण्यातून बाधा या सर्व विद्यार्थिनींवर इस्पितळात उपचार चालू

सोलापूर : येथील श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित वुमन्स पॉलिटेक्निक, वुमन्स इंजिनिअरिंग कॉलेज आणि फिजिओथेरपी कॉलेज येथील चौदा विद्यार्थिनींना अन्न किंवा पाण्यातून बाधा झाल्याने या सर्व विद्यार्थिनींवर इस्पितळात उपचार चालू आहेत.

बाधित सर्व चौदा विद्यार्थिनी श्री सिध्देश्वर गर्ल्स हॉस्टेल येथे वास्तव्यास होत्या. त्यांना भोजनातून किंवा पाण्यातून प्रादुर्भाव झाल्याने उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. तेव्हा त्यातील आठ विद्यार्थिनींना एस.टी. स्टँडजवळील सिध्देश्वर हॉस्पिटल येथे आणि सहा विद्यार्थिनींना भवानी पेठेतील समर्थ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व बाधित विद्यार्थिनींची प्रकृती पूर्ववत होत असल्याचे सांगण्यात आले. या सर्व विद्यार्थिनींवर देवस्थानच्या सर्व शिक्षण संस्थेतील प्रमुख घटक बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्यावर योग्य उपचाराची व्यवस्थाही करीत आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेतLEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here