दुबईतील शारजा येथे आषाढी एकादशीनिमित्त भजन, दिंडी, पालखीचा सोहळा

दुबईतील शारजा येथे श्री गणेश भजन मंडळातर्फे शाळेत आषाढी एकादशीनिमित्त भजन, दिंडी, पालखीचा सोहळा झाला. दिंडीत साधारण हजार बांधव कार्यक्रमात सहभागी झाले.
प्रवेशद्वारावर रांगोळी, तसेच येणाऱ्या भाविकांचे स्‍वागत करण्यात आले.

हळदी- कुंकू लावून व गजरा देवून महिला वर्गाचे स्‍वागत करण्यात आले. पुरुषांसाठी गंध लावून स्‍वागत करण्यात आले. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे अभिषेक करून पूजन करण्यात आले.

पालकांनी आपल्‍या मुलांना विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात सजवून दिंडी काढण्यात आली. ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात भाविकांनी, मुलांनी टाळ वाजवत ताल धरला, फुगड्या खेळल्‍या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here