‘शिंदे आणि फडणवीस यांची जमली आहे जोडी, अडीच वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी’

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देंवेद्र फडणवीस यांची जमली आहे जोडी, अडीच वर्ष चालणार सत्तेची गाडी’ अशी चारोळी करत शिंदे-फडवणीस सरकार हे फक्त अडीच वर्षं नाही, तर पुढील दहा वर्षे टिकणार आहे, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला.

आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनात ते बोलत होते.

यापूर्वी महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, असे आम्ही म्हणत होतो. आता विरोधक हे आमचं राज्य सरकार चालणार नाही असे म्हणत आहेत. मात्र, आमचं राज्य सरकार फक्त अडीच वर्षं नाही, तर पुढील दहा वर्षे टिकणार आहे, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला. जोपर्यंत नरेंद्र मोदी खंबीरपणे आहेत, तोपर्यंत आम्हाला कोणतीही चिंता नाही. असेदेखील ते यावेळी म्हणाले. ‘शिंदे आणि फडणवीस यांची जमली आहे जोडी, अडीच वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी’ अशी कविता आठवले यांनी सादर करताचा सभाग्रहात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here