9.2 C
New York
Saturday, April 20, 2024

Buy now

परळीतील छोट्या व्यावसायिकाचे सामाजिक भान; गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप _कौतुकास्पद उपक्रम- पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे

- Advertisement -

परळीतील छोट्या व्यावसायिकाचे सामाजिक भान; गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
_कौतुकास्पद उपक्रम- पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे_
सामाजिक भान जपणारा उपक्रम- डाॅ. संतोष मुंडे

- Advertisement -

परळी वैजनाथ : श्रीमंत व पैसेवाले भरपूर लोक असतात मात्र प्रत्येकात दानत व सामाजिक भान असेलच असे नाही परंतु परळी शहरातील एक अतिशय सर्वसामान्य व छोटा व्यावसायिक असलेल्या युवकांने सामाजिक भान जपत गेल्या सात वर्षापासून अखंडितपणे शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. आज (दि.11) मान्यवरांच्या उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
परळी शहरातील गोविंदा गोविंदा एंटरप्राइजेस या नावाने नवीन पुस्तके, जुने व नवीन पुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री करणारे विश्वंभर देशमुख यांनी अतिशय खडतर परिश्रमातून स्वतःचे दुकान सुरू केलेले आहे. मात्र फार मोठा व्यावसायिक नसतानाही नेहमी सामाजिक कार्य करण्याची धडपड या युवकाची असते. कोरोना काळातील दोन वर्ष वगळता अविरतपणे हा सामाजिक उपक्रम त्यांनी अखंडित सुरू ठेवला आहे. आज मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना 37 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.संतोष मुंडे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे, युवा सेनेचे जिल्हा संघटक प्रा.अतुल दुबे, विजय सामत, अभिनव विद्यालयाचे सचिव साहेबराव फड,ज्ञानबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे, श्रीराम फड, चारुदत्त करमाळकर, संपादक बालासाहेब फड,पत्रकार अनंत कुलकर्णी,पत्रकार महादेव गित्ते, विष्णू मुंडे, कांबळेसर, आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांचा सत्कार पदमाकर देशमुख, प्रशांत देशमुख, प्रो. प्रा. विश्वांभर देशमुख, आनंदराव कुलकर्णी, आशोक कुलकर्णी, गिरीश प्रयाग, रत्नाकर कुलकर्णी, चेतन शर्मा,उमेशराव नागापुरकर, रामेश पुरभैय्ये, सचीन गोंदगे यांनी केला.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles