पत्नीची पतीला धमकी घटस्फोट झाल्यावर ती त्याच्यासमोर 10 पुरूषांसोबत शारीरिक संबंध ठेवणार आणि नंतर काय?

पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि घटस्फोटापर्यंत विषय गेला. पण नाराज पत्नीने पतीला धमकी देत सांगितलं की, घटस्फोट झाल्यावर ती त्याच्यासमोर 10 पुरूषांसोबत शारीरिक संबंध ठेवणार आणि तो तिला काहीच करू शकणार नाही.
हे ऐकून रागावलेल्या पतीने पत्नीची हत्या केली.

पत्नीचा गळा आवळून हत्या केल्यानंतर तो मृतदेहाला खेचत घरात घेऊन गेला आणि नंतर तिला गळफास देऊन लटकवलं. मग स्वत: पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली आणि आरोपी पतीला अटक केली. ही घटना छत्तीसगढच्या बेमेतरा जिल्ह्यातील आहे.

खंडसरा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने दोन महिन्यांआधीच पत्नीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्याने सांगितलं होतं की, तो त्याच्या पत्नीसोबत लखनौला काम करण्यासाठी गेला होता. लखनौमध्ये त्याने त्याच्या पत्नीला एका दुसऱ्या पुरूषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं होतं. ज्यानंतर त्यांच्यात भांडण झालं.

5 जुलैला दोघेही ट्रेनने दोघेही दुर्गला आले. पतीने घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू केली. यानंतर 7 जुलैला दोघांमध्ये भांडण झालं. पत्नी पतीला म्हणाली की, मी तुझ्यासमोर याच घरात 10 पुरूषांसोबत शारीरिक संबंध ठेवणार. पत्नीचे हे शब्द ऐकून पत्नी संतापला. त्याने गळा आवळून तिची हत्या केली. हत्येला आत्महत्या दाखवण्यासाठी त्याने मृतदेह दोरीला बांधून लटकवला. त्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून सांगितलं की, त्याच्या पत्नीने आत्महत्या केली.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने पत्नीच्या आत्महत्येची खोटी कहाणी रचली होती. पण स्वत:च्या जबाबात तो फसत गेला. त्याच्या जबाबात तो अनेकदा फसत गेला. पोलिसांना शंका आली आणि मग पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here