नासाचा येथे एलियन राहात असल्याचा दावा

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळावर राहणार्‍या Aliens एलियन्सचा शोध लावला आहे. एलियन्सपासून मानव फक्त सात फूट दूर असल्याचे नासाचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, पृथ्वीवर राहणार्‍या आपण मानवांनी नेहमीच इतर जगात राहणार्‍या प्राण्यांची कल्पना केली आहे. आतापर्यंत अनेकांनी एलियन्स असल्याचा दावा केला. काही जणांनी एलियन्सचे फोटो टिपल्याचेही असे दावे नक्कीच झाले आहेत; पण या दाव्यांवर कोणीही विश्वास ठेवत नाही. मात्र, आता नासाने संपूर्ण जगाला एक धक्कादायक माहिती दिली असून, मंगळावर Aliens एलियन राहात असल्याचा दावा केला आहे.

मंगळावर जीवसृष्टीच्या शोधात पाठविण्यात आलेल्या मार्स रोव्हर्सना अशी माहिती मिळाली आहे की, मंगळावर सात फुटांपर्यंत उत्खनन केल्यास Aliens एलियनचे पुरावे मिळू शकतील, यासाठी प्रोटिन तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या मिनो सिडची मदत घेतली जाणार आहे. त्याच्या मदतीने सात फुटांचे खोदकाम पूर्ण झाल्यावर हे प्रोटिन सापडतील, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. या प्रोटिनचे पृथक्करण करून मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचा अंदाज घेता येईल आणि त्याबाबत काही ठोस माहिती मिळू शकणार आहे. आतापर्यंत या रोव्हरने सहा फूट खोदकाम पूर्ण केले असून अजून एक फूट खोदकाम बाकी आहे. मंगळ ग्रहावर पाणी सापडल्यामुळे तिथे जीवसृष्टी असण्याची दाट शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली होती. जर जीवसृष्टी असेल, तर ती नेमक्या कुठल्या स्वरूपाची आहे, याबाबत शास्त्रज्ञांना उत्सुकता आहे. नेमके कुठले प्राणी त्या ग्रहावर असतील, त्यांची बौद्धिक क्षमता कशी असेल, मानवाप्रमाणे उत्क’ांती झालेला एखादा प्राणी तिथे असेल का, जीवसृष्टीचा शोध लागल्यावर पुढे काय होईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या प्रयोगाच्या यशापयशावर अवलंबून असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here