‘एकनाथ शिंदे यांच्याकडे 144 चा बहुमताचा आकडा नाही, फक्त 50 आमदार आहेत – सुप्रिया सुळे

मुंबई : महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरे यांच्यासारखाच असावा, असं वक्तव्य केलं आहे.

मला उद्धव ठाकरे यांचा अभिमान आहे. बाळासाहेब नसताना उद्धव ठाकरेंनी आमदारांना भावनिक आवाहन केलं. मी भविष्य वर्तवू शकत नाही, पण कुटुंबातून कोण सोडून जात असेल, तर त्यांना परत आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ‘मी उद्धव ठाकरे यांचं ट्वीट बघितलं.

ठाकरे कुटुंबासोबत माझ्या भावना जोडल्या गेल्या आहेत. सरकार येतील आणि जातील पण ही नाती पुढे अशीच सुरू राहतील,’ अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. ‘एकनाथ शिंदे यांच्याकडे 144 चा बहुमताचा आकडा नाही. त्यांच्याकडे फक्त 50 आमदार आहेत, असं मी ऐकलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here