भारताचा आयर्लंडवर विजय

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतरही अखेर सामना पार पडला.

दोन्ही संघाना 12-12 षटकं खेळायला देण्यात आली. ज्यात आयर्लंडने108 धावा करत भारतासमोर 109 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे भारताने दीपक हुडाच्या नाबाद 47 धावांच्या जोरावर तीन गडी गमावत भारताने 9.2 षटकात पूर्ण केलं आहे.

सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. पण त्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली. ज्यामुळे सामना सुरु होण्यास बराच वेळ गेला. सामना 11 वाजून 20 मिनिटांनी सुरु झाला. ज्यानंतर भारताच्या भुवनेश्वरने पहिल्याच षटकात आयर्लंडच्या सलामीवीर कर्णधार अँन्ड्रूला तंबूत धाडलं. त्यानंतर एका मागोमाग एक गडी भारतीय फलंदाज बाद करतच होते. पण हॅरी टेक्टरने एकहाती झुंज देत 64 धावांची तुफान खेळी केली. ज्यामुळे भारतासमोर आला 109 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, चहल आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दीपकची तुफानी खेळी अन् भारताचा विजय

109 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कऱण्यासाठी मैदानात आलेल्या भारताकडून ईशानने चांगली सुरुवात केली. पण 26 धावा करुन तो बाद झाला. क्रेग यंगने त्याला बाद केलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर क्रेगने सूर्यकुमारलाही 0 धावांवर तंबूत धाडलं. त्यानंतर मात्र हार्दिकने दीपकसोबत मिळून तुफान फलंदाजी केली. हार्दिक 24 धावा करुन बाद झाला. पण दीपकने नाबाद 47 धावांची खेळी करत भारताला 9.2 षटकात विजय मिळवून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here