बीड निलंबीत मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे अंबेचोर ?

निलंबीत मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्यावर अंबेचोरीचा गुन्हा दाखल करा – अशोक तावरे

बीड : बीड नगर पालीकेचे निलंबीत मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांच्यावर शासकीय निवासस्थानातील आंब्याच्या झाडावरील आंबे चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यउपाध्यक्ष अशोक तावरे यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती असे की, बीड शहराच्या जवाहर कॉलणी परिसरात बीड नगरपालीकेच्या

मुख्याधिकान्यांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थान आहे. यानिवासस्थानाच्या कंपाऊंडच्या आतमध्ये पंधरा अंब्याची झाडे असुन, या झाडापैकी नऊ झाडांना यावर्षीच्या हंगामात पुर्ण क्षमतेने बहार येवून फळधारणा झालेली होती. काही दिवसांतच या झाडावरील परिपक्व झालेली आंबा फळे उतरावी लागणार होती. याबाबत ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यशासनाने बीड जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा आदेश दिला होता. त्या आदेशानुसार ११ मे २०२२ रोजी बीड जिल्हाधिकारयांनी बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्याच्या निवासस्थानासह सर्व शासकीय निवासस्थानातील आंब्यांच्या झाडांचा लिलाव करण्याचे आदेश काढले होते. परंतु २७ मे २०२२ रोजी बीड नगर पालीकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांचे निलंबन झाले आणि २८ तारखेच्या रात्री त्यांच्या शासकीय निवासस्थानातील नऊ आंब्याच्या झाडापेकी आठ आंब्याच्या झाडावरील केन्या गायब झाल्या, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सतत चार दिवस पाठपुरावा करून बीड नगरपालीकेचे विद्यमान मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांना निवेदन देऊन मुख्याधिकारी निवासस्थानातील आंब्याच्या झाडावरील कैऱ्यांचे काय झाले ? याची माहोता विचारली. दोन दिवसांत माहिती घेऊन सांगतो असे उत्तर मुख्याधिकारी ढाकणे यांनी दिले आहे. परंतू हि आंबा फळे ४ जुन पर्यंत मुख्याधिकारी निवासस्थानाचा ताबा असणारे निलंबीत मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांनीच कसलीही परवानगी न घेता व कोणलाही न सांगता झाडावरुन काढली आहेत. अर्थात हा चोरीचा प्रकार असून याप्रकरणी निलंबीत मुख्याधिकारी गुट्टे यांच्याकडुन सदर आठ झाडांच्या आंबा फळांची किंवा त्याफळांच्या किंमतीची रिकव्हरी करण्यात यावी. नसता त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यउपाध्यक्ष अशोक तावरे, जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, जिल्हाउपाध्यक्ष सदाशिव बिडवे, जिल्हासचिव अशोक सुरवसे, शहराध्यक्ष करण लोंढे, श्रीकृष्ण गायके, वर्षाताई जगदाळे, आशाताई घुले, दिव्या पोवळ, आकाश टाकळकर, कार्तीक जव्हेरी, राजश्री सिंघम, कल्पना कवटेकर, तुषार दोडके, अनिल जमदाडे, सुनिल टाकळकर आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here