बीड जिल्हा व तालुकास्तरावरील लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटने मध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करा – गोरख मोरे

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

आष्टी / बीड  : लोक पालक पत्रकार सुरक्षा संघटनेची घोडदौड महाराष्ट्रात जोरदार चालु आहे आताच लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदिप रोकडे व सचिव भरत कारंडे यांनी पच्छिम महाराष्ट्राचा दौरा करुन पत्रकारामध्ये उत्साहाचे वातावरण तयार करुन अनेक जेष्ठ व नामांकित पत्रकारांना संघटनेच्या विविध पदांची धुरा सोपवली आहे. पत्रकार संरक्षण कायदा,ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना,पत्रकारांसाठी घरकुल व विमा योजना,पत्रकारांची शासन दरबारी नोंदणी,पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी-मारहाण व पत्रकारावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी यासह पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा संघटनेच्या वतीने सातत्याने आंदोलने,उपोषणे,निवेदने तसेच डिजिटल मिडियाला कायदेशीर मान्यता अशा अनेक ज्वलंत विषयावर सरकार दरबारी पत्रव्यवहार सुरू असून आपण ही चळवळ अशीच पुढे चालवण्यासाठी व पत्रकारांच्या प्रश्नावर,अन्याय,अत्याचारा वरती आवाज उठवण्यासाठी पत्रकार बांधवांनी बीड जिल्हा व जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावरती लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटने मध्ये सहभागी होण्यासाठी ९६ २३ २५ ६१ ८३ या क्रमांकावरती संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आव्हान लोक पालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष पत्रकार गोरख मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे,त्याला जिल्ह्यातील विविध पत्रकारांनी भरघोष पाठींबा व्यक्त केला आहे,लवकरच प्रदेशाध्यक्ष प्रदिपजी रोकडे व सचिव भरत कारंडे अहमदनगर व बीड जिल्ह्याचा दौरा करणार असुन संघटनेची बळकट बांधणी व पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे संघटक सचिव जगन्नाथ जावळे व सहसचिव संतोष क्षेत्रे यांनी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here