10.9 C
New York
Saturday, April 20, 2024

Buy now

इम्रान खान यांची हत्या झाल्याची अफवा

- Advertisement -

माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशात पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करत मोठी रॅली काढली आहे. त्यामुळे सर्वत्र तणावाची परिस्थिती असतानाच आज इम्रान खान यांची हत्या झाल्याची अफवा पसरली आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणांनी सतर्क होत इस्लामाबादमध्ये हाय ऍलर्ट जारी केला आहे. तसेच इम्रान यांच्या ‘बनी गाला’ या घराच्या परिसरातील सुरक्षा वाढवली आहे.

- Advertisement -

इम्रान खान यांच्या हत्येच्या अफवेनंतर पोलिसांनी कलम 144 लागू करत सार्वजनिक मीटिंग घेण्यावर बंदी आणली आहे. इम्रान यांच्या हत्येच्या अफवेनंतर त्यांच्या घराची सुरक्षा वाढवली असली तरी त्यांच्या घरी सध्या कोण आहे याबाबतची माहिती पोलिसांना दिलेली नाही.

- Advertisement -

इम्रानवरील हल्ला म्हणजे पाकिस्तानवरील हल्ला

इम्रान खान यांच्या हत्येच्या अफवेनंतर पोलिसांनी आपण माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करत असून त्यांच्या समर्थकांनीही आम्हाला सहकार्य करावे असे म्हटले आहे. दरम्यान, इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला तर तो पाकिस्तानवरील हल्ला समजून तेवढय़ाच ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल असे इम्रान यांचे भाचे हसन नियाजी यांनी म्हटले आहे.

माजी मंत्र्याने व्यक्त केला हत्येच्या कटाचा अंदाज

इम्रान खान यांची इस्लामाबादमध्ये हत्या होऊ शकते असा अंदाज त्यांच्या सरकारमध्ये काम केलेले मंत्री फवाद चौधरी यांनी नुकताच व्यक्त केला होता. तसेच सुरक्षा यंत्रणांनीही इम्रान यांच्या हत्येच्या कटाबाबत एप्रिलमध्ये सतर्क केलेले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी आपली हत्या होऊ शकते असे म्हटले होते. तसेच आपल्याला कोण मारणार आहे याबाबत मी एक व्हिडीओ बनवून ठेवला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles