राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघ देशात तृतीय

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

भुवनेश्वर ओडिसा येथे पारपडलेल्या 4 थ्या फेडरेशन कप राष्ट्रीय स्पर्धेत बीड जिल्ह्यातील 12 खेळाडूंचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने तिसरे स्थान पटकावले.
महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक सुशील तांबे सर व त्यांच्या खेळाडूंनी पहिल्याच प्रयत्नात तिसरा येण्याचा बहुमान मिळवायला. भुवनेश्वर येथे आयोजित टेनिस फेडरेशन क्रिकेट स्पर्धा 26 मे तारखेपासून ते 29 मे मध्ये संपन्न झाली. या स्पर्धेत विविध राज्यांचे 12 संघ सहभागी झाले. दोन गटात ही स्पर्धा झाली. यात महाराष्ट्र संघाने तेलंगणा, हरियाणा व मुंबई संघावर विजय मिळाव ला.
सेमी फायनल मध्ये महाराष्ट्र संघाची गाठ ओडिसा साघशी झाली. यात थोड्या फरकाने महाराष्ट्र संघाचा पराभव झाला. व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या संघात विजय उमरे( कॅप्टन), वैभव लवूळ स्टफ, पृथ्वी पाटील, वैजीनाथ नागरगोजे, जालिंदर राजगुरू, अभिमान सानप, आशिष व आकाश मोहोळकर, गणेश पवार, परसू पवार, संजय गिते, विशाल बोकफोड, अवेज, श्रीकृष्ण देशमुख , आकाश आव्हाड, प्रजोत मांढरे,सुमित राठोड.यांचा समावेश होता.
सर्व खेळाडूचे अभिनंदन महाराष्ट्र मिनाक्षी गिरी , टेक्निकल डायरेक्टर स्वप्नील ठोमरे तथा बीड जिल्हा अध्यक्ष अजय धोंडे, उपाध्यक्ष अविषांत कुमकर यांनी केले. खेळाडू चे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here