डॉ जितीन वंजारे यांना दैनिक प्रभास केसरी चा राज्यस्तरीय समजभूषण पुरस्कार जाहीर

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

बीड : सामाजिक वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य असणारे डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांच्या वैद्यकीय कार्याचा आढावा घेऊन दैनिक प्रभास केसरी चा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार डॉक्टर जितीन वंजारे यांना जाहीर झाला आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने सामाजिक कार्य करणे गरजेचे आहे.ग्रामीण भागांमध्ये वैद्यकीय सेवा देताना पैशाची, उधारीची आणि आपल्या संबंधाची अडचण येते. मोठमोठ्या शहरांमध्ये वैद्यकीय व्यवसाय करताना या गोष्टीची अडचण येत नाही. बहुदा ग्रामीण भागांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवताना गोरगरिबांची सेवा निर्धनाची सेवा,दुर्लक्षित, दलित शोषित, पीडितांची,कष्टकऱ्यांची सेवा ही निस्वार्थपणे करावी लागते. कधीकधी रुग्णांकडे पैसे नसतील तर खिशातले पैसे द्यावे लागतात. ग्रामीण भागामध्ये रात्रंदिन सेवा देणारे डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेऊन दैनिक प्रभास केसरी चा समाज भूषण पुरस्कार डॉक्टर जितीन वंजारे खालापूरीकर यांना जाहीर झाला आहे.
सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीन दादा वंजारे खालापुरीकर शहरी भागात प्रॅक्टिस न करता मुद्दाम ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टीस करतात कारण ग्रामीण भागांमध्ये केलेले सेवा ही आर्थिक फायद्याची नसली तरीही यातून जी समाजसेवा घडते यातच समाधान आहे. गोरगरिबांच्या समस्या, अडीअडचणी, कौटुंबिक कलह या सगळ्या गोष्टी एक फॅमिली डॉक्टर म्हणून लोक आपुलकीने सल्लामसलत करतात. त्यातून आपण दिलेल्या सल्ल्यामुळे कित्येकांचे भले होते. आपण दिलेल्या वैद्यकीय सेवेमुळे कित्येकांना लाभ होतो.याच आत्मिक समाधान मिळतं कोरोणा सारख्या महामारी मध्ये मोफत वैद्यकीय सुविधा पुरवून रुग्णांना कोरोनाग्रस्तांना आणि सामान्य रुग्णांना त्याकाळी डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरकर यांनी मोफत आणि गरजेची सेवा दिली.2-4 वर्षापूर्वीच्या दुष्काळामध्ये बाला घाटावरील बऱ्याच छावण्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा दिली. वेगवेगळी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन ग्रामीण भागामध्ये लोकांना सेवा पुरवली. या सेवेबद्दल दैनिक प्रभास केसरीने वैद्यकीय क्षेत्राचा आणि सामाजिक क्षेत्रातील मानाचा समाजभूषण पुरस्कार- 2022 डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांना जाहीर केला आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी त्यांना मुंबई येथील प्रसिद्ध दैनिक लोकांकीत चा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मिळाला असून पुरस्काराबद्दल विचारले असता तेम्हणाले पुरस्कारामुळे मला सामाजिक कार्य करण्यास नवं बळ मिळते,मोठी प्रेरणा आणि कौतुकाची थाप मिळते त्यामुळे आणखीनच सामाजिक कार्य करण्यासाठी उत्तेजना मिळते. हा पुरस्कार मिळाल्यामुळे डॉक्टर जितीनदादा वंजारे यांचे समाजातील सर्व स्तरांमधून कौतुकाची थाप आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here