अखेर पाऊणेदोन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर बांगरवाडा साठवण तलावाच्या सांडव्याच्या भिंतीचे दुरूस्तीचे काम सुरू – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड : पाटोदा तालुक्यातील मौजे. बांगरवाडी येथील साठवण तलावाच्या सांडव्याच्या भिंतीला ८ फुट रूंद, ३ फुट खोल भगदाड पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाप्रशासन तसेच पाटोदा प्रशासनाला वारंवार निवेदन, आंदोलनानंतर अखेर तब्बल पावणे दोन वर्षानंतर दुरूस्तीचे काम सुरू झाले असून पावसाळ्यापूर्वी काम होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

लक्ष्यवेधी डुबकी आंदोलन; विभागीय आयुक्तांचे २ वेळा जिल्हाधिकारी यांना आदेश:-डाॅ.गणेश ढवळे

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सस्ते यांनी वारंवार पाटोदा व जिल्हाप्रशासनाला दिलेल्या निवेदन, आंदोलनानंतर आ.बाळासाहेब आजबे यांनी लक्ष घालुन निधी उपलब्ध करून दिला, यामध्ये दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी बांगरवाडी साठवण तलावातील लक्ष्यवेधी डुंबकी आंदोलनानंतर प्रशासनस्तरावर कामाचा वेग वाढला आणि निधी उपलब्ध करून देण्यात आला, डाॅ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या डुबकी आंदोलनात लक्ष्मण सस्ते,
बंडोपंत काळे, पोपट काळे, सुरेश सस्ते, बारीकराव काळे, भाऊसाहेब काळे, कृष्णा तांबारे, गणेश काळे, तुकाराम सस्ते, उत्तम काळे, पांडुरंग रूपनर, देविदास काळे बांगरवाडी ग्रामस्थांनी डुबकी आंदोलनात सहभाग घेतला होता.

आ.बाळासाहेब आजबे यांनी जलसंधारण मंत्र्यांची भेट घेऊन निधी आणला

दि. २४ ऑगस्ट २०२० रोजी डाॅ.गणेश ढवळे व लक्ष्मण सस्ते यांनी बांगरवाडी साठवण तलावाच्या सांडव्याला पडलेल्या भगदाडाविषयी सोशल मिडीया व दैनिकातुन वाचा फोडल्यानंतर त्यादिवशी आ.आजबेकाका यांनी उपविभागीय जलसंधारण आधिकारी ,मृद व जलसंधारण उपविभाग पाटोदा यांच्यासमवेत पाहणी करून दुरूस्तीच्या सुचना दिल्या होत्या मात्र निधीअभावी काम रखडले. डाॅ.गणेश ढवळे यांनी शासन दरबारी वारंवार पाठपुराव्यानंतर आ.आजबे काका यांनी जलसंधारण मंत्री यांची मंत्रालयात भेट घेऊन ३५ लाख रूपये निधी मंजूर करून आणला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here