मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

औरंगाबाद : औरंगाबाद पोलिसांनी मोठी कारवाई केली ,सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण, वैयक्तीक टीका टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्याआधी औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी सशर्त परवानगी दिली होती. सभेपूर्वी पोलिसांनी 16 अटी घातल्या होत्या. त्यापैकी 12 अटींचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे. यासंबंधीचं अधिकृत एफआयआर अद्याप हाती आलेलं नाही. मात्र पोलिसांच्या अटी किंवा नियमांचं पालन झालं नाही तर पोलीस कारवाई करतील, असा इशाराही दिला होता. रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर सोमवारी पोलिसांकडून या भाषणासंबंधीचा सर्व डेटा गोळा करण्यात आला. तसेच सभेच्या ठिकाणी कोणत्या अटींचं पालन झालं, कशाचं उल्लंघन झालं, याविषयीचा अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल गृहखात्याकडे पाठवण्यात येणार होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांतर्फे राज ठाकरे तसेच आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here