राज ठाकरे यांच्या धर्मजागरण महासभेस जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित रहाणार – सदाशिव बिडवे

राज ठाकरे यांच्या धर्मजागरण महासभेस जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित रहाणार असा श्रीराम बादाडे,सदाशिव बिडवे, करण लोंढे यांनी निर्धार केला आहे

बीड (प्रतिनिधी):- महाराष्ट्र दिनी 1 मे 2022 रोजी संभाजीनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राजसाहेब ठाकरे यांची बहुचर्चीत धर्मजागरण प्रचंड जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळ खडकेश्वर संभाजीनगर येथे ठिक सायं. 5.30 वाजता होणार असून या सभेस बीड जिल्ह्यातील गावा-गावातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक, राज ठाकरे प्रेमी व विविध हिंदू संघटना सहभागी होणार आहेत अशी माहिती मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे, उपजिल्हाध्यक्ष सदाशिव बिडवे व शहराध्यक्ष करण लोंढे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
महाराष्ट्राची बुलंद तोफ, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुचर्चीत धर्मजागरण प्रचंड जाहीर सभा संभाजीनगर येथे होणार असून ही सभा ऐतिहासिक करण्यासाठी सभेचे नियोजन मनसे नेते बाळा नांदगावकर,शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, दिलीपबापु धोत्रे, संतोष नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष अशोकभाऊ तावरे यांनी बहुमोल परिश्रम घेतले आहे. या सभेस उपस्थित रहाण्यासाठी बीड जिल्ह्यातून संपूर्ण तयारी झाली आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या वाहनाने संभाजीनगरकडे प्रस्थान करणार असून सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांनी, राजसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे नागरीक व विविध हिंदू संघटनांना आवाहन करण्यात येते की, आपण या होणार्‍या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्यासाठी व राजसाहेब ठाकरे यांचे विचार जनमानसात घेवून जाण्यासाठी आपण सर्वांनी सभेस उपस्थित राहवे असे आवाहनही मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे, उपजिल्हाध्यक्ष सदाशिव बिडवे, महिला जिल्हाध्यक्षा वर्षाताई जगदाळे, रेखाताई आंबुरे, व शहराध्यक्ष करण लोंढे, जिल्हा सचिव अशोक सुरवसे, उप तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण गायके, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष अंकुर गायकवाड, उप शहराध्यक्ष आकाश टाकळकर, कार्तिक जव्हेरी, शहर सचिव तुषार दोडके, अतुल कुलकर्णी, अनिल जमदाडे, आदर्श तरकसे, सुनील टाकळकर आदी मनसैनिकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here