भाऊ व पुतन्याच झाला वैरी काठी व दगडाने ठेचुन केली हत्या

भाऊ व पुतन्याच झाला वैरी काठी व दगडाने ठेचुन केली हत्या ,आरोपी पिता पुत्रा विरूद्ध परंडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल

परंडा : सुरेश बागडे ,सततच्या भांडण कटकटीला वैतागून सख्खा भावाने मुलाच्या मदतीने भावला काठीने मारहान करीत दगडाने ठेचुन जिवे मारल्याची घटना परंडा तालूक्यातील सोनगीरी येथे दि २४ एप्रील रोजी संध्याकाळी ६ वाजता घडली या प्रकरणी दोघा विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करन्यात आली आहे .

या बाबत आधीक माहिती अशी की सोनगीरी येथील महादेव भानुदास खरपुडे , सुधीर महादेव खरपुडे या दोघांना यातील मयत पोपट खरपुडे हा भावाला शेतात येऊ नका म्हणुन सतत वाद घालत होता

याच कारणा वरून सकाळी १० वाजता मयत पोपट व यातील आरोपी महादेव व सुधीर यांच्यात वाद झाला होता . सततच्या त्रासाने कंटाळून अखेर पीता पुत्राने पोपट यास काठी व दगडाने मारहान केल्याने पोपट खरपुडे हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला .

या घटनेची माहिती मिळाल्याने उप विभागीय पोलिस अधिकारी डंबाळे , पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे , सहायक पोलिस निरिक्षक हिंगे , पोना विशाल खोसे , पोहेकॉ दिलीप पवार , पोहेकॉ बळी शिंदे , पोना एस .सी गायकवाड , पोना एबी वाघमारे , चालक भिंगडे ,यांच्या पथकाने घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे .

या बाबत प्राप्त माहिती अशी की मयत पोपट यास दोन मुली व एक मुलगा असुन सतत त्रास देत असल्याने त्याची पत्नी व मुलांनी १० वर्षा पुर्वी पोपट यास सोडून गेले होते पत्नी व मुलगा पुण्याला राहत आहे .

पोपट हा त्याचा भाऊ महादेव यासह शेजारी व परिसरातील लोकांना त्रास देत होता भावाला शेतात येऊ देत न्हवता नेहमी भांडने करीत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून दि २४ रोजी संध्याकाळी ६ वाजता काठीने व दगडाने मारहान करून ठार मारले .

या प्रकरणी नवनाथ वेताळ यांच्या फिर्यादी वरून आरोपी महादेव खरपुडे व सुधीर खरपुडे या पिता पुत्रा विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करन्यात आली आहे.
उप विभागीय पोलिस आधिकारी डंबाळे यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे करीत आहेतLEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here