‘भारतातील मुसलमानधार्जिण्या विचारांना रोखण्यासाठी सहस्रो वर्षांपासून भारतात चालवले जाणारे इस्लामी मदरसे बंद केले पाहिजेत’- बॅरिस्टर खलिद उमर

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

इंग्लंडमध्ये बॅरिस्टर पदावर असणाऱ्या व्यक्तीला जे कळते, ते भारतातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांना न कळणे हे भारताचे दुर्दैव ! यातून तरी ते बोध घेतील का ?
मदरसे आणि मशिदींवर लक्ष ठेवण्याच्या मुसलमान बॅरिस्टरच्या सूचनेवर सरकार कृती कधी करणार ?
‘भारतातील मुसलमानधार्जिण्या विचारांना रोखण्यासाठी सहस्रो वर्षांपासून भारतात चालवले जाणारे इस्लामी मदरसे बंद केले पाहिजेत’, असे मत प्रसिद्ध लेखक बॅरिस्टर खलिद उमर यांनी या लेखाद्वारे व्यक्त केले आहे.

लेखक मुसलमान असून ते मूळ पाकिस्तानमधील आहेत. सध्या ते इंग्लंडमध्ये बॅरिस्टर आहेत. त्यांनी या लेखातून स्वत:चे विचार परखडपणे मांडले आहेत. भारतातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी यातून बोध घ्यावा !

१. भारतात जातीय सलोखा आणि शांतता यांसाठी ‘एक देश, एक अभ्यासक्रम’ धोरण राबवणे आवश्यक !

भारतात जातीय सलोखा आणि शांतता यांसाठी ‘एक देश एक अभ्यासक्रम’ असे धोरण ठेवले पाहिजे. भारतात समान नागरी कायदा आणण्यापूर्वी समान शिक्षण कायदा आणला पाहिजे. सर्व धर्मांच्या नागरिकांसाठी एक अभ्यासक्रम असला पाहिजे. भारतातील ३ लाख ६०० सहस्र तरुणांची मने अजूनही वर्ष १ सहस्र ७०० मध्ये केलेल्या जुन्या अभ्यासक्रमातच अडकून आहेत.

केवळ देहली येथे ३ सहस्रांहून अधिक मदरसे आहेत. देशातील जवळजवळ ६ लाख मदरसे (इस्लामचे शिक्षण देणारी मुसलमानांची शाळा) आणि त्यांना जोडलेल्या ४० ते ४५ लाख मशिदी यांमध्ये लक्षावधी विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे भारताला पुढे नेण्याचे स्वप्न कुणीही पाहू नये.

२. द्वेषाने भरलेली विषारी मने सिद्ध करणारे मदरसे !

मदरसा केवळ धार्मिक शिक्षण देणारी शाळा आहे. या शाळेमधून मुसलमान विद्यार्थ्यांना कुराण, शरिया, हदिस, इस्लामी आक्रमणांचा इतिहास (जिहाद) शिकवला जातो. भारताच्या इतिहासात इस्लामी काळापासून म्हणजेच १ सहस्र वर्षांपासून हे मदरसे आहेत. तेथे शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात बिगर मुसलमान, विशेषतः हिंदूंना ‘मूर्तीपूजक’ संबोधून मदरशांमधून द्वेषपूर्वक ‘काफीर’ संबोधले जाते. ‘घाना ई हिंद’ (जिहादच्या माध्यमातून भारतात इस्लामी सत्ता स्थापन करणे) हे भारत आणि पाकिस्तान येथील जवळजवळ सर्व मदरशांमधून शिकवले जाते. तेथून भीती आणि खोटा अहंकार असलेली द्वेषाने भरलेली विषारी मने सिद्ध केली जातात. अशा प्रकारे समाजाची उपेक्षा करणाऱ्या संस्था सुधारू शकत नाही. मनातील हे विष काढून टाकणे हाच एकमेव उपाय आहे. मदरशांना साहाय्य करणे म्हणजे स्वतःचे मृत्यूपत्र लिहिण्यासारखे आहे.

३. यू.पी.ए. सरकारकडून मदरशांमधून केवळ मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी चालू केलेली शिक्षणाची योजना अयशस्वी ठरणे आणि ती रहित करणे हाच त्यावरील एकमेव उपाय !

वर्ष २००९-२०१० मध्ये यू.पी.ए. (संयुक्त आघाडी सरकार) सरकारकडून मदरशांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी योजना चालू करण्यात आली. तिच्या अंतर्गत ‘मदरशांमधून विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, हिंदी आणि इंग्रजी या विषयांचे शिक्षण द्यावे’, असे ठरले आहे. देशातील १८ राज्यांमध्ये ही योजना अजूनही चालू आहे. या योजनेच्या अंतर्गत विविध राज्यांतील जवळजवळ २१ सहस्र मदरशांना १ सहस्र १३८ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येते. केवळ उत्तरप्रदेशमध्ये ८ सहस्र ५८४ मदरसे असून त्यामध्ये १८ लाख २७ सहस्र ५६६ मुले शिक्षण घेत आहेत. हा केवळ मूर्खपणा आहे. मदरशांमध्ये शिकवले जाणारे इस्लामविषयीचे शिक्षण हे काही सर्वधर्मसमभाव असलेले आणि मानवतावादी असू शकत नाही. मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी काँग्रेसने चालू केलेली ही योजना म्हणजे वेळ आणि अमूल्य राष्ट्रीय साधने यांचा अपव्यय आहे. त्यामुळे ही योजना रहित केली पाहिजे.

४. मदरशांमध्ये सुधारणा केली जाऊ शकत नाही, यामागील कारणमीमांसा !

इस्लामची शिकवण आणि आधुनिक शिक्षक हे एकमेकांना पूरक ठरत नाही. ‘पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते, यावर मदरशातील विद्यार्थी विश्वास ठेवील ? कि कुराणानुसार पृथ्वी ही सपाट असून सूर्य हा तळ्यातील गढूळ पाण्यात अस्ताला जातो’, यावर विश्वास ठेवील ? त्या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रेम आणि सुसंवाद साधणे शिकवू शकत नाही; कारण कुराणमध्ये त्यांना शिकवले जाते की, सर्व मूर्तीपूजकांना कायमचे नरकयातना भोगण्यासाठी पाठवले पाहिजे.

५. केंद्र सरकारने त्वरित करावयाच्या कृती !

अ. सर्व मदरशांचे राष्ट्रीयीकरण करून त्यांची नोंदणी केली पाहिजे. राज्यांना मदरशांच्या ठिकाणी शिक्षक आणि प्रशासक नेमून त्यांना अभ्यासक्रम चालू करण्याचा अधिकार दिला पाहिजे. मदरशांचे पैसे, तसेच वित्तीय अन् आर्थिक कमाई करण्याचे स्रोत पडताळले पाहिजेत.

आ. सर्व जातींसाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक शाळांमध्ये सर्व मदरशांचे रूपांतर केले पाहिजे. कोणत्याही धर्मासाठी किंवा केवळ अमुक जातीसाठी दिले जाणारे धार्मिक शिक्षण बंद केले पाहिजे. सर्व मुलांना समान अभ्यासक्रम शिकवला गेला पाहिजे.

इ. सर्व मशिदींमधून विद्यार्थ्यांना काय शिकवले जाते ? किंवा त्यांच्या मनात काय भरवले जाते ?, यावर ‘सी.सी.टी.व्ही.’च्या माध्यमातून लक्ष ठेवले पाहिजे.

ई. भारतातील शहरात शुक्रवारी ‘जुमा’ प्रार्थनेनंतर होणार हिंसाचार हा केवळ योगायोग नव्हे. जर चीन, सिंगापूर आणि इजिप्त हे देश मशिदींवर नियंत्रण ठेवू शकतात, तर जगात मुसलमान लोकसंख्येच्या संदर्भात दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत ते का करू शकत नाही ?

जर भारताने मुल्ला, मशिदी आणि मदरसे यांच्यावर नियंत्रण ठेवले नाही, तर भारतातील जातीय सलोखा अन् शांती हे केवळ दिवास्वप्नच राहील, हे निश्चित !’

( सनातन प्रभात मराठी ,साभार : बॅरिस्टर खलिद उमर, युनायटेड किंगडम यांच्या ‘फेसबूक’ खात्यावरून)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here