पाकिस्तानची अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक, ३० हून अधिक नागरिकांचा मृत्यू

इस्लामाबाद : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक केली आहे. त्यात ३० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार प्रांतातील स्थानिक अधिकार्‍यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. पाकिस्ताने शुक्रवारी रात्री पेसा मिला आणि मीर सफर भागात एअरस्ट्राईक केला आहे. तसेच खोस्त प्रांताच्या स्पेरा जिल्ह्यातही हवाई हल्ला केल्याचे स्थानिक नागरिकांनी दिले आहे. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील अनेक लोक मारल्याचे वृत्त आहे. कुनार प्रांताच्या शाल्ट जिल्ह्यातेले स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या हल्ल्यात पाच लहान मुले आणि एक महिलेचा मृत्यू झाला आहे. असे असएल तरी पाकिस्तानच्या सरकारने आणि अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु पाकिस्तानी माध्यमांनी या प्रांतातील तहरीक ए तालिबान आणि पश्तून इस्लामी दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. तहरिक ए तालिबान ही दहशतवादी संघटना आहे. ही संघटना पाकिस्तानच्या वजिरीस्तान भागात सक्रिय असून २००७ पासून या संघटनेचे आणि पाकिस्तानी सैन्यासोबत झटापटी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here