अन्नतंत्र महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
आष्टी : गोरख मोरे ,संपूर्ण मानवी समाजाला समतेची शिकवण देणारा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात साजरी करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य साईनाथ मोहळकर यांनी, डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर पक्षपात आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारकही होते. असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाव्या सत्रातील विद्यार्थी तुषार अटोळे याने केले. यावेळी शिक्षक वृंद, इतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित होते.