देव दर्शन करून निघालेल्या भाविकावर काळाचा घाला सोनारी परंडा रोडवर भिषण अपघात २ जन ठार १० जन गंभीर जखमी

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

परंडा : प्रतिनिधी सुरेश बागडे , शनी सिंगणापुर येथून देव दर्शन करून निघालेल्या भावीकांच्या पीकअपला परंडा सोनारी रोडवर खानापुर पाटी जवळ भिषण अपघात झाल्याने भुम तालूक्यातील नळेगाव येथील २ जन ठार तर १० जन गंभीर जखमी झाले हि घटना दि १३ रोजी रात्री साडे दहा वाजन्याचा सुमारास घडली .

अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे , सहाय्यक पोलिस उप निरिक्षक जगताप यांच्या पथकाने घटना स्थळी धाव घेऊन जखमींना उपचारा साठी उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले .

या अपघातात भुम तालूक्यातील नळेगाव येथिल मंगेश आत्माराम गायकवाड वय २६ याचा व बार्शी येथे उपचारा साठी दाखल केलेल्या एका तरूणाचा मुत्यू झाला आहे .

या बाबत प्राप्त माहिती अशी की भुम तालुक्यातील वडगाव नळी येथिल भावीक शनि सिंगणापुर येथील कावड यात्रा करून पीकअप वाहनाने गावा कडे परतत असताना परंडा सोनारी रोड खानापुर पाटी जवळ पीकअप व उस वाहतूक करनाऱ्या टॅक्टर ची धडक बसुन भिषण अपघात झाला या मध्ये २ जन ठार तर १० जन गंभीर जखमी झाले आहे .

या अपघाता मध्ये गंभीर जखमी झाल्याने वैभव भोजने , शुभम थिटे , प्रतिक भोजने , स्वप्नील भोजने , विनोद लोकरे , नवनाथ
हारनोळ यांना पुढील उपचारा साठी बार्शी येथिल रुग्णालया दाखल
करन्यात आले आहे .

तर रोहित इनामदार , बिरूदेव हजारे , श्रीकृष्ण झेंडरे , नवनाथ शोगे , सर्व राहनार वडगावनळी तर सावरगाव येथिल दादा कांबळे यांच्या वर परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे .

या प्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करन्याची प्रक्रीया सुरू आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here