पत्रकार जावेद शेख यांच्यावर हल्लाप्रकरणी तहसिलदार यांना भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे निवेदन, कठोर कारवाईची मागणी


पाटोदा शहरातील सांगवी रोड स्थित राजमहंमद दर्गाह मस्जिद खिदमतमास इनाम जमिन अतिक्रमित बांधकामाचे छायाचित्रे काढली म्हणून लोखंडी राॅडने व दगडाने डोक्यात वार करून जीवघेणा हल्ला प्रकरणात हल्लेखोर पठाण समदखान हमीदखान व त्यांचा मुलगा पठाण समीरखान समदखान रा.पाटोदा यांच्यावर पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच अवैध बांधकाम प्रकरणात जबाबदार तहसिल व नगरपंचायत प्रशासनातील जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार रूपाली चौगुले व उपनिरीक्षक कोळेकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष हमीदखान पठाण, सदस्य सय्यद रियाज, सचिन पवार, अजय जोशी,बशीर ईमामशाह सय्यद आदि उपस्थित होते.


सविस्तर माहीतीस्तव

पाटोदा शहरातील सांगवी रोड स्थित राजमहंमद दर्गाह मस्जिद खिदमतमास इनाम जमिन असुन सदर शेत सर्व्हे नंबर ७१४ मधिल इनाम जमिन सन १९७२ पासुन शासनाच्या ताब्यात असुन त्या जमिनीवर अनाधिकृत बांधकाम सुरू असून त्या बांधकामाचे दि.१३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ३ वा ४० वाजता मराठी पत्रकार परीषद महाराष्ट्र राज्य पाटोदा तालुकाध्यक्ष सोशल मिडीया प्रमुख पत्रकार शेख जावेद शेख रज्जाक वय ३८ वर्षे यांनी बातमीसाठी छायाचित्रे काढली म्हणून सायंकाळी ४ वा. शेख वाजेद त्यांच्या समीर सायकल स्टोअर्स दुकानात असताना दुकानात येऊन पठाण समदखान हमीदखान व त्यांचा मुलगा पठाण समीरखान समदखान यांनी कोणाला विचारून छायाचित्रे काढली म्हणत लोखंडी गज व दगडाने डोक्यात वार केले त्यातवेळी शेख जावेद यांचे बंधु शेख वाजेद शेख रज्जाक, शेख इरफान इब्राहिम यांनी शेख जावेद यांची सुटका केली त्यानंतर पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करून उपचारासाठी पाटोदा ग्रामिण रूग्णालयात दाखल केले ,त्याठिकाणी डाॅ.सावंत यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर नाकातून रक्त व चकरा येत असल्यामुळे जिल्हारूग्णालय बीड येथे रेफर केले. त्याठीकाणी जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांनी तपासून दाखल करत सिटीस्कॅन काढण्याचा सल्ला दिला. संबधित प्रकरणात पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून

सदर अतिक्रमित बांधकाम तात्काळ काढुन टाकण्यात यावेत तसेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण बांधकाम सुरू असताना जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले म्हणून तहसिल व नगरपंचायत प्रशासनातील जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here