ताज्या बातम्याबीड जिल्हामाजलगाव

बीडमध्ये माकड-कुत्र्यांचा संघर्ष


बीडमध्ये माकड-कुत्र्यांचा संघर्ष (Monkey and Dog Conflict in Beed)-

बीडमध्ये माकडं आणि कुत्र्यांच्या संघर्षाच्या विचित्र घटनेनं साऱ्यांचं लक्ष वेधलंय.
एरवी कुत्र्यांना पाहताच धूम ठोकणारी माकडं कुत्र्यांच्या जीवावर उठली आहेत. माकडं आणि कुत्र्यांमधील या भांडणाने क्रुरतेचा कळस गाठल्याचं दिसत आहे. त्यांचं भांडण या स्तरावर जाईल अशी कल्पना कुणीही केली नसेल. बीड मधील हा प्रकार पाहिल्यानंतर माकडं आणि कुत्र्यांमध्ये गँगवार चालू आहे की काय असा प्रश्न पडा

काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामधील माजलगाव इथल्या लवूळ गावात कुत्र्यांच्या टोळीने माकडाच्या पिल्लावर हल्ला करुन त्याच्या बळी घेतला होता. या घटनेनं संतप्त झालेल्या माकडांच्या टोळीनं तब्बल २५० कुत्र्यांना मारल्याचं बोललं जात आहे. कुत्री आणि माकडांमधील या सूडयुद्धाने क्रुरतेचा कळस गाठल्याचं दिसत आहे. गेल्या महिनाभरापासून ही माकडं कुत्र्यांवर सूड उगवत असल्याचं दिसत आहे. याच सूडापोटी ही माकडं कुत्र्यांच्या पिल्लांना पळवून त्यांना इमारती किंवा झाडांवर जाऊन अशा उंच ठिकाणांहून फेकून देत होते.

बीडमधील माजलगाव इथल्या लवूळ भागात हा विचित्र प्रकार घडला. सध्या गावात कुत्री आणि माकडांमध्ये संघर्ष सुरू आहे. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली असून अजून एकही माकड पकडण्यात त्यांना यश आले नसल्याचं कळतंय. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, माकडाच्या एका पिल्लास कुत्र्यांनी हल्ला करून ठार केल्यापासून माकडे कुत्र्यांची पिल्ले मारत आहेत. कुत्री आणि माकडांमधील ही बदल्याची आग कधी शमणार, कधी मोकळा श्वास घेता येणार, याचीच वाट आता सर्वांना आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *