ताज्या बातम्याधार्मिक

ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीला अपघात


जालना – सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. किर्तनासाठी जात असताना जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 10 च्या सुमारास त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला असून चालक किरकोळ जखमी.इंदरोकर महाराजांना कुठलिही इजा झाली असून ते सुरक्षित आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. एमएच 12 टीवाय 1744 या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ते प्रवास करत होते. परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर रस्ता क्रॉस करताना हा किरकोळ अपघात झाला. दरम्यान, जखमी चालक संजय गायकवाड यांना पोलिसांच्या मदतीने शहरातील अस्थिरोग तज्ञांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *