तिची सुंदरता तीच्यासाठी शाप ठरली, सुंदर दिसते म्हणून सहा वर्षापासुन घरात कोंडल

बीड : बीड जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीकडूनचं पत्नीला नरकयातना दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने पत्नीला चक्क एक दोन नव्हे तर तब्बल 6 वर्षे घरातचं डांबून ठेवले होते.

मात्र, पोलीस आणि पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून आज या महिलेची आपल्याच घरून सुटका केली आहे. महिला जेव्हा घराबाहेर पडली तेव्हा तिला नीट चालता देखील येत नव्हते. तिची अवस्था पार वाईट झाल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी देखील आल्याचं पहायला मिळाले. बीड शहरातील जालना रोडवर उघडकीस आला आहे. डांबून ठेवलेल्या पत्नीला पती सतत मारहाण देखील करत असल्याचं दिसून आले आहे. कारण पत्नीच्या अंगावर अनेक जखमा दिसून येत होत्या. पिडीत महिलेसोबत तिचे दोन मुलं देखिल पतीच्या दहशतीखाली दहशितीखाली वावरत होती.

बीड शहरातील जालना रोड शेजारी राहणाऱ्या रूपाली मनोज किन्हिकर या महिलेचं 20 वर्षांपूर्वी मनोज किन्हीकरशी लग्न झालं. सुंदर आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून संसाराला सुरुवात झाली, सुरुवातीची दोन-तीन वर्ष आनंदात गेली. पण त्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पतीने त्रास द्यायला सुरुवात केली.

रुपाली एका दुकानात कामाला जात होती. मात्र पतीला माझ्यावर संशय आल्याने त्याने तिचं कामावर जाणं बंद केलं. त्यानंतर मनोजने रुपालीचं घराबाहेर पडणंही बंद करुन टाकलं. रुपाली सांगते, पाच-सहा वर्षांपूर्वी घराबाहेर पडले होतं. पण त्यानंतर बाहेरचं जगच बघितलं नाही.. !

इतकंच नाही तर वडीलांच्या अंत्यविधीला रुपालीला जाऊ देण्यात आलं नाही. पत्नीबरोबरच दोन मुलांनाही मनोजने खूप त्रास दिला. रुपाली नावा सारखीच रुपाने सुंदर होती, पण तिची सुंदरता तीच्यासाठी शाप ठरली आणि नराधमाने तिचा छळ सुरु केला. 

रुपाली दिसायला सुंदर असल्यामुळे तिचा नवरा तिच्यावर संशय घेत होता. गेल्या 17 वर्षांपासून तिला मारहाण करत घरात डांबून ठेवलं रूपालीच्या अंगावरती अनेक जखमा आहेत, महिलेला चालता येत नाही.

शिवाजी नगर पोलिस स्टेशनला तक्रार आल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी गेले. त्या घरात माणूस पाच मिनिटं देखील थांबू शकत नाही इतका उग्र वास त्या घरात येत होता. अशा ठिकाणी पीडित महिला आणि तिची दोन मुलं राहात होती. पोलिसांनी या महिलेची सुटका केली असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here