बीड शहरातील महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या करत अधिकाऱ्यांना घेराव घालत शेतकऱ्यांचा टाहो

बीड : शेतीसाठी वीज पुरवठा व्हावा यासाठी शेतकरी राज्यातील विविध भागांत आंदोलन करत आहेत. वीज पुरवठ्या अभावी शेतीचं मोठं नुकसान होत आहे.
साहेब… आज माझ्या खिशात पैसा असता तर भीक मागितली नसती. साहेब, माझ्या खिशात पैसा नाही म्हणून साहेब तुम्हाला भीक मागतोय, केवळ आम्हाला लाईट द्या, बाकी काही नको. आमचं उभं पीकं जळतायत…

शेतकऱ्यांनी टाहो फोडला. साहेब… तुम्हाला बाप समजून पाया पडतो.. आम्हाला का पिसाळलेलं कुत्र चावलंय का ?

असं आपलं आर्त गऱ्हाणे, एका पीडित शेतकऱ्यांना थेट विद्युत वितरणच्या अधीक्षक यांच्या समोर मांडल आहे.

गावात लाईट नसल्यामुळे दहा गावच्या शेतकऱ्यांनी बीड शहरातील महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या करत अधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यावेळी या शेतकऱ्याने वास्तव परिस्थिती सांगितली. ती ऐकल्यानंतर काळजाही पाझर फुटेल.

 

बीडच्या खांडे पारगाव, नागपूर खुर्द, अंतरवन पिंपरी यासह जवळपास 7 गावांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून लाईटचा लपंडाव सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देणं जिकरीचा विषय ठरत आहे. पाण्यावाचून पिके जळत आहेत. तर जनावरांना देखील पाणी कुठून आणाव ?

 

असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. यामुळे आपली व्यथा मांडण्यासाठी शेतकऱ्यांनी विद्युत कार्यालय गाठलं होतं आणि या दरम्यान लव्हाळे नामक शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली. द आणि भयानक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नावाचा बोलबाला करत, सत्तेवर आलेल्या सरकार आणि सरकारमधील लोकप्रतिनिधी आता तरी या शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगला निर्णय घेतील का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here