10.4 C
New York
Friday, April 19, 2024

Buy now

पेट्रोल संपले, वीज नाही, रुग्णालयांचे कामकाज ठप्प झालंय, देशावर प्रचंड कर्ज

- Advertisement -

श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

- Advertisement -

राजधानी कोलंबोसह संपूर्ण देशात हिंसाचार आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आणीबाणी जाहीर केली.

- Advertisement -

जनतेकडून राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी
राष्ट्रपती भवनाबाहेर शुक्रवारी हजारो नागरिकांनी निदर्शने केली. संतप्त लोक राष्ट्रपतींना पायउतार होण्याचे आवाहन करत आहेत. सध्याच्या सरकारची धोरणे आर्थिक परिस्थितीला कारणीभूत असल्याची नागरिकांती भावना आहे. तर कोलंबोमध्ये हिंसाचार सुरूच आहे. काही संतप्त लोकांनी रस्त्यावरील वाहने पेटवली. पोलिसांच्या गाड्याही जाळल्या.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर
आर्थिक संकटामुळे सुरक्षा दल आणि सामान्य जनता आमनेसामने आली आहे. सरकराच्या निषेधार्थ जनता रस्त्यावर उतरली आहे. गर्दी पांगवण्यासाठी सुरक्षा दलाकडून फायर गॅस सोडण्यात आला. श्रीलंकेत आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात 10 जण जखमी झाले आहेत. तर 50 हून अधिक जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने स्पेशल टास्क फोर्सला पाचारण करावे लागले आहे, मात्र परिस्थिती नियंत्रणात येण्याचं नाव नाही.

देशात इंधन आणि गॅसची तीव्र टंचाई
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी 1 एप्रिलपासून आणीबाणी लागू करण्याची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली आहे. जनता स्त्यावर उतरल्याने सरकारला हा मोठा निर्णय घ्यावा लागला. जनता संतप्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे देशातील इंधन आणि गॅसची तीव्र टंचाई आहे. श्रीलंका सरकारकडे तेल आयात करण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याची मोठी कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांना पेट्रोल, डिझेलसाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

पेट्रोलपेक्षा दूध महाग
देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे की, शिक्षण खात्याकडील कागद आणि शाई संपली आहे. त्यामुळे परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वीजपुरवठाही खंडित झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे येथे पेट्रोलपेक्षा दूध महाग झाले आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles