7.8 C
New York
Thursday, April 18, 2024

Buy now

राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार – ना. धनंजय मुंडे

- Advertisement -

 

- Advertisement -

परळी वैजनाथ : परळी मतदार संघात रेशन कार्ड वाटप कार्डची दुरुस्ती, नाव वाढविणे,असा नुतनीकरण सेवा उपक्रम कौतुकास्पद आहे.महाराष्ट्रात झाला नसेल असा राशनकार्ड नुतनीकरण उपक्रम परळीत राबवला गेला. केवळ राशन कार्ड वितरित केले असे नाही तर राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळीत सांगितले.

- Advertisement -


ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व डॉ.संतोष मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.25 ते 27 मार्च दरम्यान तालुक्यातील फाटलेले, नाव दुरूस्ती, अपडेट नसलेले राशन कार्डचे नुतनीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.परळीत प्रथमच राशनकार्ड अपडेट चा सर्वोपयोगी उपक्रम राबविण्यात आला याचे नाव.धनंजय मुंडे यांनी भरभरून कौतुक केले. डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हाँस्पीटल अरूणोदय मार्केट येथे हे शिबिर घेण्यात आले.राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आज या शिबिरात मार्गदर्शन केले.याप्रसंगी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते नुतनीकरण झालेल्या राशन कार्डचे वितरण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना ना.धनंजय मुंडे यांनी सांगितले की,रेशन कार्ड वाटप कार्डची दुरुस्ती, नाव वाढविणे,असा नुतनीकरण सेवा उपक्रम कौतुकास्पद आहे.महाराष्ट्रात झाला नसेल असा राशनकार्ड नुतनीकरण उपक्रम परळीत राबवला गेला.गेल्या 20 वर्षांपासून आपण या मतदार संघातील जनतेची अविरत सेवा करत आहे. यापुर्वीही आपण परळी व तालुक्यात हजारो राशन कार्ड वितरित केले आहेत.आता राशन कार्डचे नुतनीकरण करुन देण्यात आले आहेत.नवीन रेशन कार्ड फक्त वाटप न करता राशन कार्डचे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले. आम्ही दिवसरात्र आपल्या सेवेत आहोत आणि पुढेही आपल्या सेवेत असणार आहोत.
डॉ.संतोष मुंडे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की,गरीब, गरजु व सर्व सामान्य जनतेचे गेल्या विस ते तिस वर्षापुर्वीचे राशन कार्ड दुरूस्ती व अपडेट , खुप जुने झाल्यामुळे फाटलेले, झिजलेले, व खराब जालेले राशन कार्ड त्यांना नुतनीकरण करून देणे, आपडेट नसतील तर ते अपडेट करून (१२ अंकी नंबर) नाव कमी किंवा नावलावून देणे गरजेचे बनले होते. गरीब, गरजु, शेतकरी, कामगार वर्ग, सर्व सामन्य जनता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक विधवा महिला इत्यादी समाजातील गरजू घटकास आरोग्य सेवेचा लाभ घेण्यास, बँकेत बऱ्याच व्यवहारात राशन कार्ड अती महत्वाचे असते /लागते यासाठी हे शिबीर उपयुक्त ठरले. ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून हे सर्वोपयोगी कार्य पार पडले असे त्यांनी सांगितले.शिबीराच्या पहिल्या दिवसापासून गरजुंनी प्रचंड गर्दी केली होती. या शिबिरात ३५०० जणांची नोंदणी झालीआहे.तर हजारो कार्ड दुरुस्ती करण्यात आले आहेत.


यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, नायब तहसिलदार बाबुराव रूपनर, प्रा.डॉ. विनोद जगतकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद सिराज, जोगदंड, शंकर कोचे, कलिदास पवार, अरूण रोडे, संतोष गित्ते, विनायक बळवंत, गणेश सौळुंके, प्रशांत सौनार, तनमय जैन, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाळके व इतर उपस्थित होते. सुत्रसंचालन विठ्ठल साखरे यांनी केले. कार्यक्रमास लाभार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles