मद्यधुंद अवस्थेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची मोडतोड

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

भदोही : उत्तर प्रदेशातील भदोही इथे एका मद्यपीने महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. भदोही शहरातील इंदिरा मिली भागातील चौकातील या पुतळ्याची सुभाष चौहान नावाच्या व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत मोडतोड केली.

त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. पुतळ्याची तोडफोड करण्यापूर्वी या मद्यपूने भर चौकात तासभर गोंधळ केला होता, असे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार घडल्यानंतर तेथे नागरिक आणि पोलिसांची मोठी गर्दी जमा झाली. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी निदर्शने केली.

पुतळ्याची तोडफोड करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी महात्मा गांधींचा नवीन पुतळा बसवण्यात येणार आहे, असे जिल्हा दंडाधिकारी अर्याका अखोरी यांनी म्हटले आहे. पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसच्या जिल्हा अध्यक्षांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here