9.2 C
New York
Saturday, April 20, 2024

Buy now

खुल्या व्यायाम शाळा म्हणजे लुटारुचे अड्डे

- Advertisement -

खुल्या व्यायामशाळे मार्फत खुली लुट; २५-१५ म्हणजे कार्यकर्त्यांना चरायला कुरण ;लाखाच्या साहित्यासाठी ३ लाखाचा निधी:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
ग्रामविकास व पंचायत राज विभागा अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्यामार्फत २५-१५ अंतर्गत कामात ग्रामिण भागात खुल्या व्यायामशाळेच्या नावाखाली खुली लुट होत असुन व्यायाम शाळेच्या नावावर ४ प्रकारची जी साहित्य बुजगावणे स्वरूपात अडोशाला मांडलेली आहेत, ज्या ४ साहित्याची किंमत ८० हजारांच्या आत आहे त्यासाठी मात्र ३ लाख रूपयांचा निधी देण्यात आला असून स्थानिक आमदार फंडातुन कार्यकर्ते पोसण्यासाठी वापरल्या जाणा-या २५-१५ कामामध्ये या खुल्या व्यायाम शाळेची भर पडली आहे.

- Advertisement -

२५-१५ कामे म्हणजे लोकप्रतिनिधीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना चरायला कुरण
____
स्थानिक लोकप्रतिनिधींकडून २५-१५ अंतर्गत टेंडर न भरता केवळ कार्यकर्ते पोसण्यासाठीच ही योजना असुन बोगस रस्ते, कागदोपत्रीच रस्ते आदि कामाबरोबरच आता खुली व्यायाम शाळा याची भर पडली असुन गावाच्या अडोशाला कुठेतरी न वापरात येणारी या ४ वस्तु बुजगावण्यास्रख्या लावल्या जातात, सार्वजनिक बांधकाम विभाग बीड, ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत या कामाचे नियोजन करण्यात येत असून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड ही काम करणारी यंत्रणा आहे,

- Advertisement -

गावाबाहेर किंवा आडबाजुला खुली व्यायाम शाळा;साहित्याची पुन्हा दुरूस्ती नाहीच
____
खुल्या व्यायाम शाळा या बहुतांश भागात गावाबाहेर किंवा आडोशाला एका कोप-यात साहित्य ठेवलेले असते, एकदा बसवल्यानंतर त्याकडे कोणी फिरकत नाही, दोषनिवारण कालावधी ३ वर्षाचा जरी फलकावर लिहीलेला असला तरी कोणी लक्ष देत नाही असा अनुभव आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles