12.3 C
New York
Tuesday, April 16, 2024

Buy now

बीड जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी परळीतील अँड. प्रकाश मुंडे यांची निवड

- Advertisement -

बीड जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी परळीतील अँड. प्रकाश मुंडे यांची निवड ; जिल्ह्यातून सर्व स्तरांतून होतेय अभिनंदन

बीड : परळी वैजनाथ काँग्रेसचे पक्षाचे धडाडीचे युवक नेते तथा तालुक्यात मोठा जनसंपर्क असलेले अँड. प्रकाश बाबुराव मुंडे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. यानिवडीबद्दल नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस अँड.प्रकाश बाबुराव मुंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खा.राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पटेल, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.नाना पटोले, बीड जिल्हा प्रभारी देविदास भन्साळी, खा.रजिनीताई पाटील, अशोकराव पाटील, अखिल भारतीय राष्ट्रीय किसान सभाच्या समन्वय बाबुराव मुंडे, काँग्रेस ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे, काँग्रेस प्रदेश चिटणीस अनिल मुंडे आदेशानुसार बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी परळीतील अँड.प्रकाश बाबुराव मुंडे यांची निवड नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी व खा. राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस लाख सर्वसामान्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी तसेच बीड जिल्ह्यात काँग्रेस तळागळा पर्यंत वाढविण्यासाठी व बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी व पक्षाची धेय्य धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाअधिक प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित अँड. प्रकाश बाबुराव मुंडे यांनी सांगितले.
तालुक्यातील कन्हेरवाडी येथील काँग्रेसचे निष्ठावंत अँड.प्रकाश मुंडे यांनी यापुर्वी अनेक पदावर काम केले आहे. वकील असून ,निर्व्यसनी, चांगला गुणांचा,निडर,हिम्मतवान आहे, 1990-93ला कॉलेज जीवनामध्ये परळी तालुका एन एस यु आय चे अध्यक्ष होता,1993-96 युवक काँग्रेस चा अध्यक्ष म्हणून उत्तम काम केलेले आहे.पुढे 1996 ला औरंगाबाद ला एल.एल.बी ला असताना मराठवाडा विद्यापीठात काँग्रेस प्रणित विविध पॅनल सिनेट, विद्यार्थी सांसद निवडणूकित प्रचार करून पॅनल निवडून आणण्यात फार मोठा वाटा होता. औरंगाबाद येथे माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज येथे शिक्षण घेतले, त्यांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अखिल भारतीय राष्ट्रीय किसान सभाच्या समन्वय बाबुराव मुंडे वडिल यांनी जिल्हा परिषद निवडणूक व आई ची जि. प.निवडणूकित प्रचार यंत्रणा व नियोजन फार उत्तम प्रकारे केले होते. माजी मंत्री,अशोकराव पाटील यांच्या लोकसभेच्या निवडणूक प्रचारातही खूप मोठा सहभाग असून, परळीसह संपुर्ण जिल्ह्यात त्यांचा दांडगा संपर्क आहे. युवकांमध्ये ते लोकप्रिय असून, पक्षाच्या कामांसह विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा सक्रीय सहभाग असतो, त्यांच्या याच कार्याची दखल घेवुन त्यांना आता पक्षाने जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते सक्रीय आहेत. त्यांचा शहरी आणि ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क आहे. त्यांची पक्षावरची निष्ठा व प्रेम निष्ठा याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी येणाऱ्या काळात आपण निश्चित तन-मन-धनाने प्रयत्न करू अशी ग्वाही या नियुक्तीनंतर नवनिर्वाचित सरचिटणीस अॅड.प्रकाश बाबुराव मुंडे यांनी दिली आहे. बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी परळीतील अँड. प्रकाश मुंडे यांच्या निवडीबद्दल परळीसह जिल्ह्यातून सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles