जिल्हाप्रशासनाचा नाकर्तेपणा झाडांच्या मुळावर ,उपविभागीय कार्यालयाची ईमारत पाडणार का?

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

बीड : बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्ते विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असताना दखल न घेतल्यामुळे आंदोलनकर्ते झाडावर चढुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्याचे प्रमाण वाढलेले असतानाच त्याचे निमित्त साधुन जिल्हाप्रशासन व नगरपरीषदेने संगनमातने ५० वर्षापुर्वीचे कडुलिंबाचे झाड तोडले, त्याच्या निषेधार्थ वृक्षप्रेमींनी जिल्हाप्रशासनाच्या वृक्षतोड धोरणाचे निषेधार्थ दि.२८ फेब्रुवारी रोजी शिवतिर्थ (छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय वृक्षदिंडी काढण्यात येऊन निवासी उपजिल्हाधिकारी बीड संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले होते .

जिल्हाप्रशासनातील आधिकारी जाणीवपूर्वक त्रास देतात,आंदोलनाची दखल घेत नाहीत :- माजी सैनिक प्रकाश वाघमारे
_______
आज दि.४ मार्च शुक्रवार रोजी सकाळी उपविभागीय कार्यालय बीड समोरील कडुनिंबाच्या झाडावर चढुन आंदोलन करणारे माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांच्या म्हणण्यानुसार मोचीपिंपळगाव आवारात अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणात वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून सुद्धा प्रशासन दखल घेत नसुन प्रशासनातील आधिकारी दिशाभूल करून पत्रव्यवहार दडवुन ठेवतात, वरीष्ठांना कळवत नाहीत, त्यामुळेच अखेर झाडावर चढुन आंदोलन करण्याची वेळ आली.

आंदोलनकर्ते प्रकाश वाघमारे यांना झाडावरून उतरून आधिका-यांशी बैठक
____
झाडावर चढलेले माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांच्याशी शिडीवरून चढुन वरीष्ठ आधिका-यांशी चर्चा करून लेखी पत्र देण्याचे आश्वासन देऊन खाली उतरवुन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत व उपविभागीय आधिकारी बीड नामदेव टीळेकर, तहसिलदार सुरेंद्र डोके यांच्याशी चर्चा करून मोचीपिंपळगाव अवैध उत्खनन प्रकरणात चौकशीचे लेखी पत्र देऊन मंडळ आधिकारी यांना तात्काळ चौकशी करून अहवाल कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी बैठकीत भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शेख युनुस च-हाटकर, आपचे बीड शहराध्यक्ष सय्यद सादेक, डीपीआयचे आनिल तुरूकमारे आदि उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here