शेतकऱ्यांसाठी शासनाने आणली कडबा कुट्टी अनुदान योजना, सरकारकडून शेतकऱ्यांना “एवढे” अनुदान.

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

वेगवेगळ्या योजना राबवत असतं. जनावरांची योग्य निघा राखण्यासाठी जनावरांना योग्य खुराक, चारा मिळणे गरजेचे असते. जनावरांच्या आहारासाठी शासनाने (government) गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कडबाकुट्टी अनुदान योजना आणली आहे. याविषयी सविस्तर माहिती
शेतातून (farm) आणलेला चारा किंवा कडबा आहे तसा जनावरांना खाऊ घालणे योग्य ठरत नाही. आणलेला चारा 2 दिवसात सुकून जातो आणि असाच चारा जनावरांना वापरल्यामुळे दुधात घट होण्याचे प्रमाण जास्त असते, तसेच जनावरांना योग्य आहार मिळतोय याची खात्री कमीच. यासाठीच सरकारने कडबा कुट्टी अनुदान योजना आणली आहे.

कडबा कुट्टी अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 75 टक्के अनुदान शासनाकडून दिले जात आहे. या योजनेतुन शेतकरी कडबा कुट्टी यंत्र आणि मोटार घेण्यासाठी शासनाकडून 75 टक्के अनुदान मिळवू शकतात. शासनाने या योजनेला काही नियम व अटी ठेवल्या आहेत. त्या कोणत्या सविस्तर पाहुया..

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी (farmers) ग्रामीण भागात राहणार असावा. अर्ज करणारा अर्जदार सातबारा धारक शेतकरी असणे गरजेचा आहे.

• शेतकऱ्याच्या नावावर 10 एकर पेक्षा जास्त शेतजमीन नसावी. अल्पभूधारक शेतकरी असावा.

• राष्ट्रीयकृत बँकेत खाते गरजेचे. बँक खात्याला त्याचा आधार क्रमांक लिंक असणे गरजेचे.

•बँक पासबुक झेरॉक्स

•आधार कार्ड झेरॉक्स

शेतकरी वर्गाला या योजनेची माहिती सविस्तर घेण्यासाठी
ग्रामपंचायतीमध्ये जाऊन भेट घ्यावी. महाराष्ट्रातील कुठलाही नागरिक जो सातबारा धारक शेतकरी (farmers) आहे तो आपल्या ग्रामपंचायतीत कडबा कुट्टी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here