रुपाली आणि योगेश या दोघांचा विवाह आज होणार होता. आणि त्याच लग्नाची खरेदी करण्यासाठी हे दोघेही रविवारी शहरातील बाजारपेठेत आले होते. मात्र त्या पूर्वी बाजारात होणाऱ्या पतीसह आलेल्या बहिणीवर भावाने हल्ला केलाय.
बीड : शहरात एका मुलानं आपल्या सख्या बहिणीवर प्राणघातक हल्ला केल्यानं एकच खळबळ माजली आहे. वर्दळीच्या ठिकाणी हा हल्ला घडल्याने परिसरात दहशत निर्माण झालीय. बहिणीचे दुसरे लग्न मान्य नसल्याने सख्ख्या बहिणीवर भावाने हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात रूपाली नरवडे आणि योगेश बागडे हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत.
रुपाली आणि योगेश या दोघांचा विवाह आज होणार होता आणि त्याच लग्नाची खरेदी करण्यासाठी हे दोघेही रविवारी शहरातील बाजारपेठेत आले होते. मात्र त्या पूर्वी बाजारात होणाऱ्या पतीसह आलेल्या बहिणीवर भावाने हल्ला केलाय. हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या बीड शहर पोलिस आरोपी धनंजय बनसोडे याचा शोध घेत आहेत.