बीड शहरात हिरो मोटरसायकल शोरूमसह गोदामाला भीषण आग

बीड : बीडमध्ये बाईक शोरुमला भीषण आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांच्या नव्या कोऱ्या बाईक्स जळून खाक झाल्या आहेत. बीडमध्ये बाईक शोरुमला भीषण आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांच्या नव्या कोऱ्या बाईक्स जळून खाक झाल्या आहेत.

बीड शहरात हे हिरो मोटरसायकल शोरूमसह गोदामाला भीषण आग लागली आहे. आज रविवारचा दिवस असल्याने सुदैवाने यामध्ये कर्मचारी कार्यरत नव्हते, मात्र आगीची माहिती मिळताच मालकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

अखेर बीड अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आगीत लाखोंच्या नवीन मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत.

दरम्यान याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानं बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. आग एवढी भीषण असून गोदामासह शोरूम मध्ये देखील पसरली आहे. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here