बीड: बीडच्या दौलावडगाव येथील कत्तखान्यावर बीड (Beed) पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी गोवंशीय मांस, जनावरांसह एक टेम्पो असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ( police) जप्त केला आहे.
बीडच्या आष्टी (Ashti) तालुक्यातील असणाऱ्या, दौलावडगाव शिवारात पत्र्याचे शेडमध्ये आरोपी खलील अरुण कुरेशी, दलील हारून कुरेशी यांनी कत्तलखाना सुरू केल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीवरून बीड पोलिसांनी (police) छापा मारला असता, पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना (Slaughterhouse) सुरू असल्याचे दिसून आले आहे. यावेळी तब्बल 40 जनावरांची कत्तल केल्याचे समोर आले असून 6 लाख 20 हजार रुपयांच्या 5 टन मांसासह टेम्पो आणि कार असा एकूण 13 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात 11 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात डोंगराच्या पायथ्याला पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना सुरू केल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस अधीक्षक यांनी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार कुमावत यांनी केजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला असता पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना सुरू असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणाहून तीन इसम पळून गेले आहेत