ऍडव्हान्स टेक्निक मेकअप सेमिनार कार्यक्रम संपन्न

पाथर्डी येथे ऍडव्हान्स टेक्निक मेकअप सेमिनार कार्यक्रम संपन्न

आष्टी : पाथर्डी येथे ऍडव्हान्स टेक्निक मेकअप सेमिनार कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे मैत्रिणी शीला बडे, मयुरी इजारे ,ज्योति शर्मा, या त्रिकुटाने उत्तम प्रकारे कार्यक्रम
घडवून आणून इथल्या तरुणींना सुंदर मार्गदर्शन मिळवून दिले
हा व्यवसाय हल्ली घरी राहून करता येते म्हणून बायकांचा यांच्याकडे कल वाढला आहे त्यातच असा कार्यक्रम पाथर्डी सारख्या तालुक्यात झाला पार्लर वाल्यांसाठी सुवर्णसंधी होती तसेच येथे काही फुड स्टॉल आणि काही ज्वेलरी स्टॉल होते त्यात नाथ समाजातील जागृती पानसरे यांचा सहभाग होता आणि यांच्या काही मैत्रिणी चा सुद्धा सहभाग होता. आपण चाकोरीबाहेर काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास प्रत्येक महिलामध्ये होता.
यामध्ये नाथ संघटना महाराष्ट्र महिला अध्यक्ष यांची छोटी बहीण जागृती कैलास पानसरे यांनीही पार्टिसिपेट केले होते त्यांना सिनेमा सृष्टीतील नामवंत कलाकार सौंदर्यवती किशोरी शहाणे यांच्या हस्ते ट्रॉफी व अडव्हांस मेकअप
टेकनिक 2022 .मेकअप आर्टिस्ट चे सर्टिफिकेट देवून
सन्मानित केले
हा कार्यक्रम खूप उत्कृष्ट व उत्साहात झाला या सर्व मेकअप सेमिनार मध्ये सहभागीचे व उत्कृष्ट यांचे
राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक बाबा नाथ जाधव,
नाथ संघटना राज्य महिला अध्यक्ष
सुवर्णाताई शिंदे ,संजय बामणे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here