महिलेशी डाॅक्टरचे गैरवर्तण प्रकरणात;त्रिसदस्यीय समिती स्थापन ,नेकनुर कुटीर रूग्णालय
____
नेकनुर कुटीर रूग्णालयातील महिलेशी असभ्य वर्तण केल्याची विविध दैनिकातुन प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हासरचिटणीस भाजपा महिला आघाडीचे शिष्टमंडळ व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे यांनी काल दि.२१ फेब्रुवारी सोमवार रोजी जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांना लेखी निवेदन देऊन वादग्रस्त डाॅ.अशोक बांगर यांच्या निलंबनाची मागणी केली होती, तसेच कारवाई न झाल्यास जिल्हारूग्णालयासमोर धरणे आंदोलनाचा ईशारा दिला होता .
त्रिसदस्यीय समिती स्थापन, चार दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश:-डाॅ.गणेश ढवळे
____
डाॅ.अशोक बांगर, कंत्राटी आयुष वैद्यकीय आधिकारी कुटीर रूग्णालय नेकनुर यांचे गैरवर्तनाबद्दल विविध दैनिकातुन तसेच दि.२० फेब्रुवारी रोजी डाॅ.गणेश ढवळे यांची लेखी तक्रार व अड.संगिता धसे व डाॅ.गणेश ढवळे यांच्या शिष्टमंडळाशी प्रत्यक्ष चर्चेनंतर त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली असून त्यांना ४ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, त्रिसदस्यीय समितीत डाॅ.एस.एस.राऊत, वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हारूग्णालय केज, डाॅ.एस.एस.शहाणे, वैद्यकीय अधिक्षक ग्रामिण रूग्णालय रायमोहा, डाॅ.राजश्री शिंदे, वैद्यकीय आधिकारी गट-अ,जिल्हारूग्णालय बीड यांची समिती गठीत केली असून ४ दिवसात कार्यालयास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास स्थगित:-अड. संगिता धसे
_____
महिला रूग्णांशी असभ्य वर्तण करणा-या महिलांमध्ये असुरक्षिततेचे दहशतीचे वातावरण निर्माण करणा-या वादग्रस्त डाॅ.अशोक बांगर यांना निलंबित करण्यात यावे अन्यधा आज दि. २२ फेब्रुवारी मंगळवार रोजी जिल्हारूग्णालयासमोर धरणे आंदोलनाचा ईशारा दिला होता परंतु जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुरेश साबळे यांनी त्रिसदस्यीय समिती गठीत करून ४ दिवसात अहवाल तपासणीनंतर ठोस कारवाई करण्याचे लेखी आश्वासनानंतर आजचे धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे, शिष्टमंडळात शैलाताई मुसळे, माधुरी कोहणुरकर, संजीवनीताई राऊत, अश्विनी झणझणे, शालिनीताई चाटे तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समिती कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, बीड तालुकाध्यक्ष शेख युनुस, पाटोदा तालुकाध्यक्ष हमीदखान पठाण यांचा समावेश होता.