अन्नतंत्र महाविद्यालयात , महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
आष्टी : स्वच्छतेची शिकवण देऊन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज मानवतेचे खरे परोपकारी, सामाजिक समरसतेचं मूर्त स्वरूप म्हणजे गाडगे महाराज. गाडगे महाराजांनी गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी आयुष्यभर तळमळीने कार्य केले. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करत त्यांनी माणसातील अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली. आज अशा थोर समाजसुधारक असलेल्या गाडगे महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आनंद चॅरिटेबल संस्था संचलित अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य साईनाथ मोहळकर, अन्न रसायन व पोषण विभाग प्रमुख प्रा. पवार एम. पी., प्रा. पाटील आशिष ,प्रा. भोपळे एस. जी.,यांनी गाडगेबाबा विषयी विषयी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका गजमल डी. बी. आणि आभार प्रदर्शन प्रा. राऊत डी. डी.यांनी केले. यावेळी प्रा. देवकर एस. पी., प्रा. कडभने व्ही.एस, प्रा.चित्ते ए. एस, प्रा. अडसारे ए. डी. राऊत ए.एच,अनारसे डी.एम, पठाण एम. बी व इतर कर्मचारी उपस्थित होते.