सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणा-या महसुल “लेखणीबंद “आंदोलनाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणा-या महसुल “लेखणीबंद “आंदोलनाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन 
_____

बीड : वाळुमाफिया व महसुल प्रशासनातील संघर्ष दरम्यान सामान्य नागरिकांना वेठीस धरत लेखणीबंद आंदोलन पुकारणा-या महसुल प्रशासनातील आधिका-यांचे वेतनबंद करून फौजदार प्रक्रीया संहिता १९७३ मधील कलमांचा तसेच कलम ३५३ कलमांचा गैरवापर करणा-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच बीड जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणातील मुख्य सुत्रधार महसुल संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय हांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच गेवराई तालुक्यातील शहजानपुर चकला येथील सिंदफणा नदीपात्रातील ४ अल्पवयीन मुलांच्या मृत्युप्रकरणात स्थानिक ग्रामविकास यंत्रणा, महसुल प्रशासनातील आधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२१ फेब्रुवारी २०२२ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक “अन्नत्याग आंदोलन ” करण्यात येत असून आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शिरूर( कासार)अशोक कातखडे, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन, गणपत गिरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे आदि सहभागी आहेत.

५००० रेशनकार्ड गायब प्रकरणातील मुख्य सुत्रधार संतोष हांगे महसुल संघटनेचा जिल्हाध्यक्ष गुन्हे दाखल करा
________
बीड जिल्हा पुरवठा विभागातुन ५००० रेशनकार्ड गायब प्रकरणातील मुख्य सुत्रधार संतोष हांगे हे महसुल संघटनेचे जिल्हाध्यक्ष असुन त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात यावा.

लेखणीबंद आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे काय??
_____
बीड जिल्ह्य़ातील विविध भागातील वाळुघाटांचे लिलाव नसताना स्थानिक राजकीय नेते व काही महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांच्या आर्थिक देवाणघेवाणीतुनच वाळुमाफियांसोबत असलेल्या संबधातुनच वाळु माफिया व महसुल प्रशासनातील संघर्ष पेटला असुन त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसुल बुडवून सामाजिक कार्यकर्ते अथवा भ्रष्टाचार विरोधात लढणा-यांवर महसुल प्रशासनातील आधिकारी फौजदार प्रक्रीया संहीता १९७३ मधील संरक्षण कलमांचा तसेच ३५३ कलमांचा गैरवापर करताना दिसून येत संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच त्यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे ,वाळु माफिया व महसुल प्रशासनातील संघर्ष वाढण्यास महसुल प्रशासनातील आधिका-यांचे वाळुमाफियांसोबत हितसंबंध कारणीभूत असुन लेखणीबंद आंदोलनाने सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरण्याचा प्रकार निषेधार्ह असुन त्यांना लेखणीबंद आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे काय??

लेखणीबंद आंदोलनात सहभागी कर्मचा-यांचे वेतनबंद करा
________
महसुल कर्मचारी कामावर गैरहजर राहुन लेखणीबंद आंदोलनात भाग घेणार असतील तर त्यांचे वेतनबंद करून बेकायदेशीर रित्या सर्वसामान्य निगरीकांना वेठीस धरणा-या आंदोलकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी .

पर्यावरणाचा नाशास कारणीभूत अवैध वाळु, मुरूम अवैध उत्खनन प्रकरणात जबाबदारी निश्चित करा
__________
पर्यावरणाचा नाश करणा-या नदीपात्रातील अवैध वाळु उत्खनन तसेच गायरान डोंगरातुन अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात संबधित ग्रामविकास यंत्रणेतील, महसूल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी.

सह्याद्री-देवराई जळीतकांड प्रकरणात उच्च स्तरीय चौकशी करा
_________
बीड तालुक्यातील सह्याद्री-देवराई जळीतकांड प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून बीड जिल्ह्य़ातील वृक्षलागवडीसाठी झालेल्या खर्चाचे ऑडीट करण्यात यावे .

आंदोलनकर्त्यांसाठी निवाराशेड उपलब्ध करा
____
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ५० वर्षीय कडुनिंबाचे झाड तोडल्यामुळे आंदोलनकर्ते यांची गैरसोय होत असुन निवारा शेड उभारण्यास परवानगी देण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here