अल्पवयीन व मतिमंद मुलीस फिरायला नेण्याच्या बहाण्याने महिलेनेच अन्य लोकांशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याची घटना

पाटण : अल्पवयीन व मतिमंद मुलीस फिरायला नेण्याच्या बहाण्याने महिलेनेच अन्य लोकांशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याची घटना तालुक्यात उघडकीस आली. संबंधित पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून महिलेसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या संशयितांची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. त्या संबंधितांना कऱ्हाडच्या न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी मिळाली आहे.

पोलिसांनी सांगितले, की अटक केलेली महिला त्या मुलीच्या घराशेजारी राहते. ती महिला त्या अल्पवयीन, मतिमंद मुलीला खायला देऊन फिरायला नेत असत. त्याच कालावधीत त्या मुलीला बाहेर नेऊन त्या लोकांशी ओळख करून देऊन त्या लोकांशी वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट झाले आहे.

लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. १७ जानेवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान घटना घडली. संबंधित अल्पवयीन मुलीवर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार झाला. घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन व मतिमंद मुलीला ओळखीचा फायदा घेऊन संबंधित महिलेने पैसे कमविण्यासाठी मार्ग अवलंबल्याचेही पुढे आले आहे. नेहमीच खायला देते, फिरायला नेते आणि पैसे देते, अशी आमिषे दाखवून त्या महिलेने मुलीची त्या लोकांशी ओळख करून दिली. एकावेळी एकाची ओळख व त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आहे. असे आठ लोक आहेत. या एक महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी मतिमंद मुलीवर अत्याचार झाला. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

त्यात महिलेसह नऊ जणांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक निंग्रज चौखंडे तपास करत आहेत. संशयितांना अटक करण्यास सुरुवात केली. मात्र, नक्की काय प्रकार आहे लक्षात येत नव्हते. सकाळी अटक केलेल्या संशयितांचे नातेवाईक पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी संशयितांची नावे जाहीर केली नाहीत. ढेबेवाडी विभागातील घटना ताजी असताना पाटण परिसरातील घटनेने झोप उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here