बीडमध्ये लेझर शो च्या माध्यमातून आणि पारंपारिक पथनाट्याद्वारे शिवजयंती साजरी केली . तर संपूर्ण बीड शहर सध्या भगवमय झाल आहे.
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती रोषणाई
Beed Shiv Jayanti 2022: रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव.. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती रोषणाई. रात्री बरोबर बारा वाजता बीडकरांनी मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. फटाक्यांची आतिषबाजी सोबत लेझर शो यामुळे बीड शहरातील जन्मोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. तडफदार पोवाडा आणि त्याच पोवाडावर लेझर शोची रंगसंगती यामुळे हा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता.