लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध

पुणे :  लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध (Physical Relation) ठेऊन तिला गरोदर (Pregnant) केले. तसेच जबरदस्तीने गर्भपात (Abortion) करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रघुनाथ बबनराव कुचिक Raghunath Babanrao Kuchik (रा.
येरवडा) याच्याविरोधात बलात्काराचा (Rape In Pune) गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
(Pune Crime)

याप्रकरणी एका 24 वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल, गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल येथे 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसोबत प्रेमसंबंध निर्माण करुन लग्नाचे आमिष दाखवले. फिर्यादीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून फिर्यादी गरोदर राहिल्या. तेव्हा त्यांची संमती नसताना जबरदस्तीने गर्भपात केला. या बद्दल कोणाला काही सांगितले तर तुला मारुन टाकील, अशा धमक्या दिल्या आहेत. तसेच फिर्यादी यांची तब्येत ठीक नसताना फिर्यादीकडून समजूतीच्या करारनाम्यावर सह्या करुन घेतल्या म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी IPC 376, 313, 506 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here