लग्न जुळत नसल्याने तरुणाने आत्महत्या

लग्न जुळत नसल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. लग्न जुळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे.
गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील महेंद्र नामदेव बेलसरे (२७) या तरुणाचे लग्न जुळत नव्हते. त्यामुळे तो निराशेच्या गर्तेत सापडला होता. गुरुवारी सकाळी शेतात जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. निराशेतून युवकाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला.

युवकाने स्वतःचे सरण रचत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची चर्चा रंगली होती. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने स्वतः च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. त्यामुळे शेतातील पऱ्हाटीची गंजी जळाले. युवकाने सरण रचले नव्हते असं पोलीस पाटील गजानन पाटील यांनी सांगितलं आहे. खामगाव ग्रामीण पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here